अंधार्या वस्तीतला उजेड
मुख्य रस्त्यावरची ती वेश्या वस्ती… काही बायका बाजेवर बसल्या होत्या… अगदी रिकाम्या… काहीच काम नसल्यासारख्या… तशीही ही वस्ती दिवसभर गडद मेकअप उतरलेल्या चेहऱ्यासारखी… झगमग लायटिंगमधील बंद केलेल्या बल्बसारखी… लॉकडाऊनमध्ये थोडा भकासपणा वाढल्यासारखा… स्थानिक कार्यकर्ते व आम्ही बाजेवर बसलेल्या बायकांशी बोलायला गेलो. एक बाई थोडे बोलू लागली. पत्रकाराने कॅमेरा काढताच लाईट बंद व्हावा तशी ती गप्प …